आधारः एलिझाबेथ ग्रॉझ - लेख सूची

डार्विन आणि स्त्रीवादः संवादी शक्यता

निसर्गाविषयी भूमिका घेण्याबद्दल स्त्रीवाद्यांमध्ये बहुतांशी प्रतिकूलता आढळते. निसर्ग म्हणजे निष्क्रिय, अपरिवर्तनीय, ज्याविरुद्ध लढावे लागेल असा अडथळा – असेच चित्रण स्त्रीवादी साहित्यात दिसते. स्त्रीवादी राजकारणाचा रोखही बढेशी असाच राहिला आहे. अर्थात् मानवी किंवा सामाजिक जीवनाच्या जीवशास्त्रीय विश्लेषणाबद्दल स्त्रीवाद्यांना वाटणाऱ्या शंका अप्रस्तुत नाहीत. कारण शास्त्रज्ञांनी जीवशास्त्रीय अध्ययनांमध्ये शरीर, शारीरिक क्रिया-प्रक्रिया यांच्याविषयी मांडलेली गृहीतके, त्यांसाठी वापरलेली तंत्रे व …